Chinchwad : बँकेने सील केलेल्या फ्लॅटमध्ये राहिल्याने एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – बँकेने सील केलेल्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2 जुलै 2023 ते आजपर्यंत वाल्हेकरवाडी येथे घडला आहे.

याप्रकरणी रवी प्रल्हाद बागडे (वय 58 रा.पिंपरी) यांनी शुक्रवारी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून  रुथ विन्सेंट लोबो (वय 38 रा.वाल्हेकरवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Talegaon Dabhade : कोणत्याही परवानगी शिवाय शेतात नांगरणी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचा फ्लॅट बँकेने सील केला आहे. असे असताना देखील तो कोणत्याही परवानगी शिवाय फ्लॅटवर ताबा घेत रहात होता.

ही बाब लक्षात येताच बँकेने आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. चिंचवड पोलीस याचा तपास करत (Chinchwad) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.