Pune : 12 वर्षाची मुलगी गर्भवती राहिली अन् उघडकीस आला धक्कादायक प्रकार

एमपीसी न्यूज –  बारा वर्षाची अल्पवयीन मुलगी, पोटात अचानक दुखू लागल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल (Pune ) झाली. तपासणीनंतर डॉक्टरांना धक्काच बसला. कारण बारा वर्षाची ही अल्पवयीन मुलगी गर्भवती होती. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आणि उघडकीस आला धक्कादायक प्रकार. एक तरुणाने तिला रिक्षात बसवून नेत दोन ते तीन वेळेस तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले होते.

Pune : मुक्तांगण इंग्लिश स्कूलच्या संचालकाविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अविनाश परडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे. एप्रिल 2023 मध्ये हा संपूर्ण प्रकार घडला.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी तरुण हा छोटा हत्ती वाहनातून पाणी पुरवण्याचे काम करतो. यातूनच त्याची या पीडित मुलीसोबत ओळख झाली होती. ओळखीचा आणि पीडित मुलीच्या अल्पवयाचा फायदा घेऊन आरोपीने तिला स्वतःच्या गाडीत बसून भुलेश्वर या ठिकाणी नेले.
या ठिकाणी असलेल्या झाडीत नेऊन आरोपीने तिच्यावर दोन ते तीन वेळा लैंगिक अत्याचार केला. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास (Pune ) सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.