Pune : शहरातील पाणी कपातीचा निर्णय रद्द

74 टक्के,तर 21 टीएमसी इतका चार धरणात पाणी साठा जमा

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून (Pune) पुणेकर नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागले.पण पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार ही धरणात जोरदार पाऊस सुरू आहे.त्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय मागे घेत आहे,अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुणे महानगरपालिका पाणी पुरवठा नियोजनाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस येथे अधिकारी वर्गा सोबत बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पुणे शहर आणि जिल्हय़ातील पाणी नियोजनाबाबत मे महिन्यात बैठक झाली होती. त्यावेळी हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली होती. तेव्हा पाऊस उशिरा येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

त्यानुसार आठवड्यामधून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच जून आणि जुलैच्या मध्यापर्यंत पाऊस कमीच झाला. पण जुलै महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसात जोरदार पाऊस झाल्याने धरण साठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. त्यामुळे आता पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात आला असून उद्यापासून सुरळीत पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील शेती करीता उद्या उद्यापासून नियोजित आवर्तन सोडले जाणार आहे.आता दोन महिन्यानंतर पाणी नियोजन बाबत बैठक घेतली जाणार असल्याचे त्यांनी (Pune) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.