Pune Crime News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस ( Pune Crime News )पार्टीचे उपाध्यक्ष दयानंद इरकल  यांनी तरुणीचा विनयभंग केला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना काल रात्री पावणे 9 च्या सुमारास घडली.या प्रकरणी 25 वर्षे तरुणीने चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दयानंद इरकल यांच्यासह संध्या माने इरकल तसेच इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

Maharashtra News : पहाटेचा शपथविधी ही तर जाणती भागीदारी आणि मतदारांच्या मताचा अवमान – मुकुंद किर्दत

फिर्यादी तरुणीने फिर्याद दिलेल्या नुसार, फिर्यादी तरुणी ही काल रात्री पुण्यातील एस बी रोड वरुन पूना हॉस्पिटल च्या दिशेने तिच्या दुचाकी वरुन प्रवास करत होती. यावेळी तिच्या पुढे असलेल्या चार चाकी ( एम एच 12 डी डब्ल्यू 0001) वाहनाला तिने हॉर्न दिला.

हॉर्न वाजवल्यामुळे इरकल यांना राग आला आणि ते गाडीतून खाली उतरले. त्यांनी त्या तरुणीला विनयभंग केला तसेच गाडीत बसलेल्या संध्या माने इरकल यांनी त्या तरुणीच्या गालावर आणि ( Pune Crime News )गळ्यावर नखांनी बोचकरले तसेच हाताने आणि चापलेनी मारहाण केली. त्यांच्यासोबत असलेल्या इतर 2 जणांनी देखील त्या तरुणीला मारहाण करत शिवीगाळ केली. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.