Alandi : सिद्धबेटजवळील जुना बंधारा जलपर्णी मुक्त होण्याच्या मार्गावर

एमपीसी न्यूज : आळंदी येथील सिद्धबेट जवळील (Alandi) जुन्या बंधाऱ्यातील बहुतांशी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यात आल्याने येथील बंधाऱ्यावरील नदीपात्र जलपर्णी मुक्त होण्याचा मार्गावर आहे. जेसीबी मशीनसह बोट व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने येथील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे कार्य सुरू आहे.

जुन्या बंधाऱ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा फायदा संबंधित जलपर्णी काढणाऱ्यांनी घेतला. तेथून बोटीसह कर्मचाऱ्यांनी बंधाऱ्याखालील कमी खोल नदीपात्र असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जलपर्णी बंधाऱ्यातून तेथे लोटली. सद्यस्थितीत बंधाऱ्याखालील ती जलपर्णी जेसीबी मशीनसह कर्मचारी वर्गातर्फे काढण्याचे कार्य सुरू आहे.

सुपरवायझर नंदकुमार तरस याबाबत म्हणाले, तेथील नदीपात्र खोल नसल्याने तेथे मशीन फिरण्यास सोयीस्कर होते. याची कल्पना घेत जलपर्णी तिथे लोटण्यात आली. त्या बंधाऱ्याखालील (Alandi) लोटलेली जलपर्णी पाेकलेन मशीनद्वारे काढण्याचे काम सुरू आहे.

Maharashtra News : पहाटेचा शपथविधी ही तर जाणती भागीदारी आणि मतदारांच्या मताचा अवमान – मुकुंद किर्दत

योग्य अशा कल्पेनेचा वापर करत कमी वेळेत जुन्या बंधाऱ्यातील जलपर्णी काढण्याचे काम बोटिसह कर्मचाऱ्यांनी करून दाखवले आहे. तसेच येथील बंधाऱ्यातील व बंधाऱ्याखालील जलपर्णी काढण्याचे काम पिंपरी चिंचवड पालिकेतर्फे होत असल्याने आळंदी नगरपालिकेचे तेथील जलपर्णी काढण्यासाठी लागणारे लाखो रुपये वाचणार आहेत. नदीपात्रही जलपर्णी मुक्त होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.