Sangvi News : सांगवीत पोलिसांचे पथसंचलन

एमपीसी न्यूज  – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Sangvi News) पार्श्वभूमीवर सांगवी परिसरात पोलिसांनी पथसंचलन केले. निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पाडण्यासाठी मतदारांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी मंगळवारी (दि. 14) सकाळी दहा ते दुपारी बारा वाजताच्या कालावधीत पथसंचलन करण्यात आले.

Chinchwad Bye-Election : चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेचा भाजपला पाठिंबा

महादेव मंदिर, पिंपळे सौदागर गावठाण, काटे पेट्रोल पंप, स्वराज गार्डन चौक, सुदर्शन चौक, जगताप पेट्रोल पंप, वैदु वस्ती, डायनासोर गार्डन, शेल पेट्रोल पंप, काशी विश्वेश्वर चौक, काटेपुरम चौक, कृष्णा चौक, साई चौक, सांगवी पोलीस स्टेशन या मार्गावरून हे पथसंचलन झाले.

पथसंचलनात आरपीएसएफ मधील तीन अधिकारी, 75 जवान, सांगवी पोलीस स्टेशनचे (Sangvi News) दोन पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक आणि 40 जवान सहभागी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.