Pune Bye-Election : कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या ‘किंगमेकर’ची प्रचारातून माघार

एमपीसी न्यूज : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Pune Bye-Election) आता प्रचार यात्रा सुरू झाली आहे. भाजपचे अनेक प्रचारक प्रचारासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. परंतु, भाजपच्या कसबा जागेसाठी किंगमेकर असलेले गिरीश बापट यांनी मात्र प्रचारातून माघार घेतली आहे. त्यामुळे आता भाजपचा स्टार प्रचारक कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भाजपचे नेते गिरीश बापट गेले काही महीने आजारी आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ काढून गिरीश बापट यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आजारपणात कामे करत असल्याचे सांगितले तसेच भाजपच्या कसबा जागेसाठी प्रचार करणार असल्याचेही आश्वासन दिले होते.

Chinchwad Bye-Election : चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेचा भाजपला पाठिंबा

परंतु, आता तब्येतीमुळे त्यांना शक्य नसल्याने ते प्रचारात उतरणार नाहीत. त्यांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावे लागत आहे. त्यामुळे त्यांना बाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे ते वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरून प्रचार करू शकणार नाहीत. असे बापट यांनी सांगितले.

भाजपच्या कसबा मतदारसंघात त्यांनी बरेच (Pune Bye-Election) कार्य केल्याने ते या प्रचाराचे किंगमेकर होते. मागील अनेक वर्षांपासून त्यांची कसब्यात सत्ता होती. त्यामुळे त्यांचा फायदा नक्कीच भाजपला झाला असता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.