Sangvi : मुलाला आईविषयी वाईट सांगितल्याच्या संशयावरून दोन सवतींमध्ये भांडण

एमपीसी न्यूज – मुलाला त्याच्या आईविषयी वाईट सांगितल्याचा संशय घेत एका महिलेने तिच्या सवतीला मारहाण केली. ही घटना कोकणे चौक, पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि 17) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

कुंदन नितीन अहिरे (वय 29, रा. कोकणे चौक, पिंपळे सौदागर) या महिलेने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनिता चंद्रकांत सूर्यवंशी (वय 30, रा. दिघी) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिता ही फिर्यादी कुंदन यांच्या पतीची पहिली पत्नी आहे. तिचा मुलगा कुंदन यांच्यासोबत राहत आहे. त्याला भेटण्यासाठी अनिता रविवारी सकाळी आली होती. त्यावेळी आरोपी महिलेने ‘माझ्या मुलाला माझ्या विषयी काहीतरी वाईट सांगितले आहे’ असे म्हणत कुंदन यांना मारहाण करत पोटामध्ये लाथ मारली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.