Alandi News : श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत संस्कारक्षम मातृ पितृ पूजन सोहळा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेत संस्कारक्षम असा मातृ -पितृ पूजन सोहळा बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला. आयुष्य एक दिवा आहे. पणं त्याच दिव्याला उजेडात आणणारी ज्योत म्हणजेच आई -वडील असतात. (Alandi News) अशा या आई – वडिलांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. म्हणूनच त्यांच्या प्रती प्रेमभाव, आदर,कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले परम कर्तव्य असते. हे व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मातृ- पितृ पूजन दिन.

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात मातृ पितृ पूजन सोहळ्याची सुरुवात माऊलींच्या मूर्ती  पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे सचिव  अजित वडगावकर,मंजुश्री वडगावकर आणि  विद्यार्थ्यांचे आजी  आजोबा , आई वडील उपस्थित होते.प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व अनेक दाखले देऊन आई वडिलांचे महत्त्व विशद केले. संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी आई वडील हे माऊलींचे रूप असून आपल्या जडणघडणीत व जीवन यशस्वी होण्यात त्यांचा सर्वात मोठा सहभाग असतो अशा माऊलींचे पूजन आपल्या प्रशालेत दरवर्षी होत असते ही आनंदाची बाब आहे असे विचार व्यक्त केले.

हा संस्कारक्षम सोहळा  दरवर्षीप्रमाणेच भावपूर्ण वातावरणात साजरा झाला.  या वर्षी आई वडिलां बरोबरच आजी – आजोबा देखील बहुसंख्येने उपस्थित होते. (Alandi News) प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी इतर भाषांमध्ये आई वडीलांना काय म्हणतात याची माहीती देऊन विद्यार्थ्यांना माता-पित्यांचे पूजन कसे करावे याविषयीचे मार्गदर्शन केले.

Mhalunge : दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

विद्यार्थ्यांनी सूचनेप्रमाणे प्रथम आई वडीलांना कुंकुम तिलक करून त्यांच्या मस्तकावर अक्षता वाहून हार घातला व ओवाळले. त्यानंतर आई वडिलांनी देखील मुलांना कुंकुम तिलक केले. हार घालून ओवाळले व दोघांनीही एकमेकांना गोड खाऊ, खाऊ घातला. मुलांनी आई वडीलांना सात प्रदिक्षणा घालून त्यांच्या पायावर नतमस्तक झाले. आई वडिलांनी मुलांना मिठीत घेऊन त्रिलोचन बनण्याकरिता आशिर्वाद दिले. मुलांनी देखील आई,वडिल,गुरुजनांचा आदर करण्याचा संकल्प केला.

हा सोहळा पार पडण्यासाठी  वर्षा काळे, निशा कांबळे ,वैशाली शेळके,  प्रतिभा भालेराव , राहुल चव्हाण या सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. (Alandi News) कार्यक्रमाची सांगता माऊलींच्या पसायदानाने झाली.याबाबत माहिती काळे सरांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.