Shirur : डॉ. अमोल कोल्हे यांना सामाजिक संघटनांचा पाठिंबा

एमपीसी  न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
आज, रविवारी नारायणगाव येथीला मुक्ताई मंदिरामध्ये  नारायणगाव व वारुळवाडी ग्रामस्थांनी संयुक्त ग्रामसभा घेऊन डॉ. अमोल कोल्हे यांना एकमुखाने सर्व सामाजिक संघटनांचा पाठींबा जाहीर केला.

या ग्रामसभेला डॉक्टर असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, नाभिक संघटना, सोनार असोसिएशन, सर्व पतसंस्थांचे अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष,  गणेश मंडळे, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी लोकवर्गणीतून १० लाखांचा निधी जमा करण्यात आला. वाडीवस्ती, आपल्या गावात असपासच्या गावात अशाच पध्दतीने छोट्या छोट्या गाव बैठका घेऊन डॉ. अमोल कोल्हे यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.