Maval : नववर्षाच्या मुहूर्तावर नवीन दुकानांची उद्घाटने अन खासदार बारणे यांची क्रिकेटच्या मैदानात हजेरी

एमपीसी न्यूज- गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर खासदार बारणे यांच्या हस्ते नवीन दुकानांची उद्घाटने झाली. दुकानांचे उद्घाटन करून खासदार बारणे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व रोटरी क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘रोटरी क्रिकेट लीग’ या क्रिकेट सामन्यांना हजेरी लावली.

देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सर्वत्र प्रचाराची धामधूम सुरु आहे. शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार श्रीरंग बारणे निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. मागील काही दिवसांपासून प्रचार दौरे सुरु असताना शनिवारी (दि. ६) खासदार बारणे यांनी गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर चापेकर चौकातील गिरिधारी वडेवाले, विलेश पवार, विनिश पवार यांचे पिराजीस केक शॉप या दुकानांचे उद्घाटन केले. दरम्यान चिंचवडगावातील श्री धनेश्वर महादेव मंदिर, प्राधिकरणातील श्रीराम सेवा मंडळाला भेट देऊन वाल्हेकरवाडी येथील हिंदू नववर्ष स्वागत समिती, प्राधिकरण-निगडी मधील भारतीय संस्कृती मंच, सावरकर मंडळ, दुर्गेश्वर मित्र मंडळ, राजमुद्रा ग्रुप, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रांमध्ये सहभाग घेतला.

यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, नगरसेवक अमित गावडे, मोरेश्वर शेडगे, करूणा चिंचवडे, नामदेव ढाके, रवी कळमकर, मिलिंद देशपांडे, बिभीषण चौधरी, डॉ. गिरीश आफळे, रमेश हवेली, सुरेश वाडकर, रमेश सरदेसाई, विश्वास करंदीकर, रजनीश तेलंग, राजेंद्र बाबर, सोपानराव ढमाले, अविनाश शालू, मीनानाथ इनामदार, रामकृष्ण कुलकर्णी, शशिकांत शेणोलीकर, सागर दिवाकर आदी उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ पिंपरी, पिंपरी टाऊन, चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथे ‘रोटरी क्रिकेट लीग’ या क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. त्या स्पर्धेला बारणे यांनी भेट दिली. बारणे यांनी यावेळी रोटरीच्या सदस्यांशी संवाद साधला. रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अशोक शिंदे यांना मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊन बारणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी संतोष अगरवाल, गणेश कुदळे, मल्लिनाथ कलशेट्टी, शशांक फडके, वैजयंती आचार्या, विजय तारक, सदाशिव काळे, नितीन ढमाले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.