Shirur Extortion Case: एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस 72 तासात केले जेरबंद

एमपीसी न्यूज : शिरूर शहरातील सराफाकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीस पोलिसांनी 72 तासात जेरबंद केले आहे. (Shirur Extortion Case) शहरात झालेल्या या प्रकरणामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राहुल गायकवाड, रा. कोहकडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर असं या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 4 जुलैला नेहमीप्रमाणे दुकानात आलेल्या शिरूर शहरातील सराफ व्यावसायिक वैभव खाबिया यांना अनोळखी नंबर वरून अज्ञात व्यक्तीने फोन करून व मेसेज करून मी DK ग्रुप मधून बोलत आहे अशी बतावणी केली. तू मला खंडणीसाठी एक कोटी रुपये दिले नाही तर मी तुला व तुझ्या कुटुंबियांचा गेम वाजवणार, तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून DK ग्रुपचे नाव सांगून सराफ व्यावसायिक वैभव खाबिया यांंस त्यांच्या कुटुंबियासह जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सादर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे अन्व्हेषन शाखेच्या तपास पथकाला योग्य त्या सूचना करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. शहरात झालेल्या प्रकरणामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

फिर्यादी खाबिया यांना धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीने टाकली कडेवाळीत, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथे 3 जुलैला पंढरीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा मोबाईल चोरला . त्या मोबाइलचा व त्यामधील सिम कार्डचा वापर करून सराफ खाबिया यास कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देऊन 1 कोटी रुपयांची खंडणी मागितीली. असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. (Shirur Extortion Case) तपास पथकाने गुप्त बातमीदाराच्या मदतीने सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी सुखदेव गायकवाड याने केला असल्याची माहिती मिळाली. यामुळे त्याचा तपास घेण्यात आला. तो लोहगाव, पुणे परिसरात असल्याची माहिती मिळाली.

त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने लोहगाव परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा पैशांच्या गरजेपोटी केला असल्याचे सांगितले. तसेच या आरोपीवर यापूर्वी पारनेर, सुपा, श्रीगोंदा, शिरूर, शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. तो सध्या शिक्रापूर, श्रीगोंदा येथील एकूण चार गुन्ह्यात दीड वर्षांपासून फरार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.