Shivsena Result : धनुष्यबाण कोणाचे? निवडणूक आयोग देणार आज निकाल

एमपीसी न्यूज : शिवसेना पक्षाच्या (Shivsena Result) धनुष्यबाण चिन्हावर आज निवडणूक आयोग आपला निकाल देणार आहे. त्यामुळे हे चिन्ह ठाकरे गटाचे का शिंदे गटाचे यावरून आज चांगलीच रस्सीखेच होणार आहे. आता निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी  आज पर्यंतची वेळ दिली होती. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीआधीच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निकाल लागण्याची शक्यता आहे.

Government Job Fraud : सरकारी नोकरीच्या बहाण्याने तिघांची 15 लाखाची फसवणूक

शिवसेना कुणाची? या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार (Shivsena Result)पडली होती. यावेळी सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगावर निर्णय लादला.  27 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कोणाला द्यायचं यावर सुनावणी घेण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 7 ऑक्टोबर पर्यंतची वेळ दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.