Chakan Accident : भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज : पिकअप जीपच्या (Chakan Accident) धडकेत दुचाकीस्वार इसम ठार झाल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक (चाकण) येथे गुरुवारी 6 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. संतोष मनोहर पाचारणे (वय 42, रा. तिन्हेवाडी, राजगुरुनगर, ता. खेड) असे या अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.

Chakan Accident 

नाशिक बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या पिकअप जीपने (क्रमांक एम एच 14 जे एल 0214) चाकण येथील हॉटेल ब्ल्यू सहारा समोर (Chakan Accident) रस्त्यालगत थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून जोरदार ठोकर दिली. यात दुचाकीस्वार पाचारणे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पिकअप जीप चालक शिवाजी धोंडू चौधरी (रा. राजगुरुनगर, ता. खेड) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.

Shivsena Result : धनुष्यबाण कोणाचे? निवडणूक आयोग देणार आज निकाल

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.