Shree Ram Mandir : श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेचा अक्षता कलश पश्चिम महाराष्ट्रात

एमपीसी न्यूज – अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्र (Shree Ram Mandir)अर्थात श्री रामलला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी रविवारी (दि.5) अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रांताकरिता विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, प्रांत समरसता सहप्रमुख निखिल कुलकर्णी यांनी श्रीराम जन्मभूमी विश्वस्त उडूपी पीठाधीश्वर विश्वप्रपन्नाचार्यजी महाराज यांचेकडून विधिवत पूजा करून सिद्ध केलेल्या अक्षतांचा कलश स्वीकारला.

यावेळी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महामंत्री चंपतराय, (Shree Ram Mandir)विहिप केंद्रीय मंत्री कोटेश्वर, विहिप केंद्रीय मंत्री गोपाळजी, अयोध्येचे महापौर, विविध आखाड्याचे संत, धर्माचार्य आदी उपस्थित होते.

Gunaratna Sadavarte : राज्यात एसटी बस सेवा सुरळीत सुरू

याप्रसंगी अक्षता कलश वितरण सोहळ्यात देशभरातील विश्व हिंदू परिषदेच्या 45 प्रांतातील प्रमुख पदाधिकारी यांचेकडे श्रीराम जन्मभूमी मंदिरात पूजलेल्या अक्षता कलश, प्रभू श्रीरामाचे छायाचित्र आणि माहितीपत्रक देण्यात आले. अयोध्येतून देण्यात आलेल्या या अक्षता कलशांचे विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या 24 जिल्ह्याचा अक्षता कलश पूजनाचा कार्यक्रम,26 नोव्हेंबर रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे.

प्रांताचा एकत्रित पूजन कार्यकम पुणे येथे संपन्न झाल्यानंतर जिल्हानिहाय अक्षता कलश पूजन कार्यकम होणार आहेत; आणि त्यानंतर आमंत्रण म्हणून रामभक्ताकडून त्या अक्षता घरोघरी देण्यात येणार आहेत. अयोध्येत मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व भाविकांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने ‘माझे गाव माझी अयोध्या’ या संकल्पनेनुसार भाविकांनी आपले गाव, आपला परिसर, घरीदारी धार्मिक अनुष्ठान, नामसंकीर्तन करीत स्थानिक मंदिरात महाआरती, प्रसाद वितरण करून लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवून आनंदोत्सव साजरा करावा.

यानिमित्त परिसरात रांगोळ्या, घरांवर भगवे ध्वज आणि पताका लावून परिसर सुशोभित करावा; तसेच सायंकाळी घरांसमोर किमान पाच दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा, देशभर 1 ते 15 जानेवारी 2024 रोजी व्यापक जनसंपर्क होणार आहे. 22 जानेवारी 2024 ला मंदिर केंद्रीत कार्यक्रम सर्व गावात व वस्तीत होणार आहेत सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन असे आवाहन विश्व हिंन्दू परिषदेचे प्रांतसह मंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.