Gunaratna Sadavarte : राज्यात एसटी बस सेवा सुरळीत सुरू

एमपीसी न्यूज: सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते(Gunaratna Sadavarte) यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे. या संपात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी-कामगार सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला होता मात्र हा दावाही खोटा ठरताना दिसतोय.

राज्यभरातील एसटी वाहतूक सुरळीत सुरु आहे. वर्धा, कोल्हापुर, माजलगाव येथिल एसटी सुरु(Gunaratna Sadavarte) आहेत. त्यासोबतच ठाणे,पाटोदा,दिग्रस,हिंगोली,आणि कळंब आगारातील एसटी बससेवा पूर्णपणे सुरु आहे.

Virat Kohali : सचिनशी बरोबरी करू शकत नाही-विराट कोहली

दोन वर्षांपूर्वी एसटी महामंडळाचे विलिनीकरण, सातवा वेतन आयोग,या विविध मागण्यांसाठी एसटी संप पुकारण्यात आला होता. एसटी कर्मचाऱ्यांच्या या उत्सफुर्त संपात गुणरत्न सदावर्ते यांनी पाठिंबा दिला. या संपानंतर एसटी कर्मचाऱ्यांची संघटना त्यांनी सुरू केली होती.

सदावर्ते यांनी एसटी संपाची हाक दिली. मात्र सदावर्तेंच्या आवाहानाला कोणीही प्रतिसाद नाही. वर्धा, कोल्हापूर, माजलगाव, पैठण, ठाणे,  पाटोदा आगार, दिग्रस आगार, यवतमाळ विभाग, हिंगोली आगार,  कळंब आगारात एसटीची वाहतूक सुरळीत सुरू आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात 85 टक्के नादुरुस्त बसेस धावत आहे. सातवा वेतन आयोग आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला. अशी माहिती सदावर्ते यांनी माध्यमांना दिली.

पण या बंदला सध्या तरी कोणीही पाठिंबा दिला नसुन बस सेवा सुरळीत सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.