Pune : फळभाज्यांच्या दरात घसरण, पालेभाज्यांचे दर वाढले.

एमपीसी न्यूज : पुण्याच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात या रविवारी (Pune)फळभाज्यांची आवक वाढलेली दिसून आली. त्यामुळे कांदा, हिरवी मिरची, वांगी, शिमला मिरची यांच्या दरात 10_20 टक्क्यांनी घट झाली.

मार्केट यार्ड मध्ये रविवारी परराज्यातून फळभाज्यांची आवक (Pune)झाली आहे. त्याचबरोबर स्थानिक भागातून भेंडी, गवार, टमाटे ,भुईमूग, भोपळा, कोबी यांची मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे दरात घसरण पाहायला मिळत आहे.

बटाटा स्थानिक भागासह इंदौर, आग्रा इथुन मार्केट मध्ये दाखल झाला. 40-45 टेम्पो बटाट्याची मार्केट मध्ये आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील आडते विलास भुजबळ यांनी एका वृत्तपत्राला दिली.

Talegaon Murder : किरकोळ कारणावरून तरुणाचा खून

पालेभाज्यांचे दर मात्र वाढलेले आहेत.पालेभाज्याची (Pune)आवक कमी झाल्यामुळे हे दर वाढलेले दिसुन येत आहेत .

नवरात्री नंतर फुलांचे दर घसरलेले आहेत. मार्केट यार्डात फुलांची आवक वाढली आहे. त्यात फुलांची मागणी कमी झालेली आढळून आली.त्यामुळे फुलाचे दर घसरले आहेत.
सीताफळ, चिकू, लिंबू, डाळिंब याची आवक वाढल्याने दारात दहा टक्के घट झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.