Pimpri : वाढदिवसानिमित्त अमित गोरखे यांनी राबविलेला पुस्तकांचा उपक्रम राजकारणात पथदर्शी ठरेल – डॉ. गिरीश आफळे

एमपीसी न्यूज – “आपला वाढदिवस पुस्तकांना आणि वाचनाला (Pimpri)प्राधान्य देत अशा अनोख्या पध्दतीने साजरा करत समाजाला दिशा देण्याचे काम अमित गोरखे यांनी केले. कला आणि साहित्यात रुची असलेले राजकारणी नेहमी सामाजिक भावनेतून आणि संवेदनशीलपणे कार्यरत असतात. वाढदिवसानिमित्त अमित गोरखे यांनी राबविलेला हा पुस्तकांचा उपक्रम राजकारणात सर्वांसाठी पथदर्शी ठरेल, असे गौरवोद्गगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक तथा ज्येष्ठ साहित्यिक गिरीश आफळे यांनी काढले.

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी (Pimpri)अध्यक्ष तथा भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवड येथे आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ . गिरीश आफळे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी ‌व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य हेमंत हरहरे, विनोद बन्सल, संदीप जाधव, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी मंत्री बाळा भेगडे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना नेत्या सुलभा उबाळे, इरफान सय्यद ,भाजपा सरचिटणीस शैला मोळक, संजय मंगोडेकर, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, शितल शिंदे ,अमित गावडे, केशव घोळवे, शर्मिला बाबर, जयश्री गावडे, उत्तम केंदळे, बापू घोलप, शत्रुघ्न काटे, मोरेश्वर शेडगे ,योगिता नागरगोजे ,कैलास कुटे, राजू बाबर, गणेश लंगोटे, देवदत्त लांडे, रघुनाथ जवळकर ,कमलेश भारवाल,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी-चिचंवड शाखा अध्यक्ष राजन लाखे, नवयुग साहित्य मंडळाचे संस्थापक राज अहिरराव, साहित्यिक वैभव ढमाल, परमानंद जमतानी, प्रदीप पवार, दत्तोपंत पिंगळे, रविकांत कळमकर यांच्यासह साहित्यिक, कलाकार आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Virat Kohali : सचिनशी बरोबरी करू शकत नाही-विराट कोहली

अमित गोरखे यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन करताना डॉ. गिरीश आफळे पुढे म्हणाले की, अमित गोरखे यांचे कर्तृत्त्व नेत्रदीपक प्रगती आम्ही पाहिली. सर्व क्षेत्रात यशस्वी कामगिरी करूनही ते नम्र आहेत. त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद भूषिवले. शिक्षण आणि राजकारणात काम करताना कलारंग संस्थेच्या माध्यमातून साहित्य, कला क्षेत्रासाठी ते काम करतात. हे कातुकास्पद आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुस्तक देऊन दिल्या पाहिजेत‌. पुस्तकांची देवाण-घेवाण होणे, हे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात प्रथमच लहान मुलांपासून तरुणांपर्यंत वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने हा केलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. असे ते म्हणाले.

आमदार महेश लांडगे यांनी देखील अमित गोरखे यांना शु‌भेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच, राजकीय, साहित्य क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी अमित गोरखे यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक स्विकारून अमित गोरखे यांनी आपला वाढदिवस साजरा केला. नोव्हेल शिक्षण संस्था, कलारंग कला संस्था, पिंपरी-चिंचवड ऑलंपिक असोसिएशन, महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद पिंपरी चिंचवड, अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र, भारतीय विचार साधना महाराष्ट्र, कामगार साहित्य परिषद, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, पिंपरी चिंचवड, बंधूता प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड, मातंग साहित्य परिषद, समरसता साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड साहित्य मंच यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

अमित गोरखे यांच्यावर तळागाळातील माणसासाठी काम करण्याचे संस्कार – शंकर जगताप
“कोणत्याही क्षेत्रात यशोशिखर गाठत असताना संस्कार अतिशय महत्वाचे आहेत. शिक्षण, कला आणि सामाजिक क्षेत्रात भरीव काम करतानाच अगदी झोपडपट्टीत जाऊन तळागाळातील माणसासाठी ते काम करतात. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत. त्यांची साहित्यातील रुची आहे. म्हणून त्यांच्या हातून लोकांना साहित्याचा आनंद देण्याचे काम वाढदिवसानिमित्त होत आहे”, अशा शब्दांत अमित गोरखे यांना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण त्याचबरोबर रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र घावटे यांनी केले आभार अनुराधा गोरखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यात राम गायकवाड,प्रवीण पोळ ,प्रशांत शिंदे, भानुदास नेटके,शैलेश लेले,दिनेश देशमुख, धंनजय खुडे, सागर बहिरवाडे , अजित भालेराव, धरम वाघमारे, मंगेश नेटके, महेश गावडे यांनी मेहनत घेतली.

दोन दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवडकरांनी अत्यंत चांगला प्रतिसाद या पुस्तक सोहळ्याला दिला 5000 पेक्षा जास्त पुस्तके यावेळी नागरिकांनी घेतली. पुस्तक विक्रीतून आलेला काही निधी काही सामाजिक संस्थांना अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची माहिती अमित गोरखे यांनी दिली.
वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुरेश खाडे, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे,आमदार श्रीकांत भारतीय यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.