Pune : सिंहगड, प्रगती एक्स्प्रेस उद्या रद्द

डेक्कन क्विनवर ताण; प्रवाशांची गैरसोय 
एमपीसी न्यूज – मुंबईत उद्या (बुधवारी) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यामुळे पुण्याहुन मुंबईला जाणारी सिंहगड आणि प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे उद्या केवळ डेक्कन क्विन ही सुरु राहणार असून प्रगती आणि सिंहगड एक्स्प्रेस गाड्याच्या प्रवाशांचा ताण डेक्कन क्विनवर येणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय मात्र होणार आहे. 
 

मुंबई आणि परिसरात आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच त्यात दिवसेंदिवस वाढ होत असून पुढील दोन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकातून सकाळी 6.5 वाजता सुटणारी सिंहगड एक्स्प्रेस तसेच 7.50 वाजता सुटणारी प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तर सकाळी 7.15 वाजता सुटणारी डेक्कन क्विन नियोजित वेळेत सुटणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या गाड्या मुंबईकडूनही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. प्रवाशांची गैरसोय नको
 
रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा म्हणाल्या, दररोज पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यात सिंहगड ही सकाळची पहिली गाडी असल्याने प्रवासी त्याने जाण्यास प्राध्यान्य देतात. मात्र, तांत्रिक कारणामुळे या गाड्या रद्द झाल्यास डेक्कन क्विनवर प्रवाशांचा ताण येतो. त्यामुळे वाढलेल्या गर्दीमुळे प्रवाशांना अनेक गैरसोईचा सामना करावा लागतो. त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एकाच वेळी दोन गाड्या रद्द करण्याचा प्रकार टाळावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.