RMK : दक्षिण आफ्रिकेच्या तज्ज्ञ शिष्टमंडळाची आरएमके क्रशर, सोलर युनिटला भेट

एमपीसी न्यूज – नवलाख उंबरे औद्यागिक वसाहतीतील ‘जेसीबी’ कंपनीच्या दक्षिण आफ्रिकेच्या तज्ज्ञ शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. 11) आरएमके (RMK) क्रशर युनिट व सोलर प्लांटला भेट दिली. सौरउर्जेवर सुरु असलेले क्रशर युनिट, मावळातील निसर्ग सौंदर्य आदींबाबत परदेशी पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. आरएमके ग्रुपने केलेली प्रगती अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अनेकांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी उद्योजक रामदास काकडे यांचे प्रयत्न याबाबत देखील पाहुण्यांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी जेसीबी प्रमुख अँड्र्यू बॉयर्स, विक्री उत्पादन व्यवस्थापक पेट्री डुटोईट, पूर्व आफ्रिकेतील जिल्हा व्यवस्थापक डॅनियल इरास्मस, बेल व्यवस्थापकीय संचालक जॉन फ्लीटवुड, बेल अलायन्स मॅनेजर स्टीफन मॅकनील, बेल कोस्टल महाव्यवस्थापक जॉन कॉलिन्स, बेल केंद्रीय महाव्यवस्थापक निक किरियाकोस, बेल कोस्टल सेल्स मॅनेजर टायरॉन रेवेनस्क्रॉफ्ट, बेल सेंट्रल सेल्स मॅनेजर डॅरेन होल्डर आदी मान्यवर तसेच JCB चे कंपनी कामगार उपस्थित होते. प्रसंगी RMK ग्रुप क्रशर युनिटचे उपाध्यक्ष राहुल काकडे तसेच RMK क्रशर प्लांटचे प्रमुख तुषार लोखंडे आदी पदाधिकाऱ्यानी पारंपारिक शाल व पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले व युनिटची संपूर्ण माहिती त्यांना दिली.

मावळ भागात विस्तारलेला उद्योग-

व्यवसाय हा महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. क्रशर प्लांटवर (RMK) असलेल्या सर्व अत्याधुनिक सुविधा तसेच सोलरवर चालणारा क्रशर पाहून परदेशी पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. क्रशरवर असणारे पर्यावरण पूरक स्प्रिंकलर, भोवती असणारी हिरवीगार झाडे, मावळातील नितांतसुंदर निसर्गसौंदर्य, थंडगार हवा याबाबत देखील परदेशी पाहुण्यांनी आनंद व्यक्त केला.

भारतामध्ये ग्रीन एनर्जीचा उपयोग करून पर्यावरण पूरक सोलर असलेला सोलर प्लांट व अत्याआधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशी मशिनरी पाहून पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. RMK ग्रुपने केलेली प्रगती ही अनेकांसाठी आदर्श आणि प्रेरक अशी आहे. आपल्या उद्यमशीलतेतून अनेकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी अहोरात्र काम करणारे उद्योजक रामदास काकडे यांचे प्रयत्न निश्चितच उत्तम आणि आदर्शवादी असल्याचा अभिप्राय परदेशी पाहुण्यांनी दिला.

सूत्रसंचालन चैतन्य फुलसुंदर यांनी केले, तर स्वागत अर्जुन शेटे, गणेश दाभाडे यांनी केले आणि आभार अर्जुन मोटे, देविदास ससाणे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.