Warkari News : पायी दिंड्यांदरम्यान वाहतूक पोलिसांची नेमणूक करा

एमपीसी न्यूज – कार्तिक एकादशी (आळंदी यात्रा) निमित्त कोकण भागातून येणाऱ्या पायी दिंड्यांना संरक्षण (Warkari News) म्हणून वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी भाजपचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांनी वडगाव मावळ पोलिसांकडे केली आहे. मागील वर्षी मावळ तालुक्यातील साते येथे दिंडीत एक पिकअप घुसले आणि त्यात काही वारकऱ्यांचा मृत्यू झाला. अशा घटना इतर मार्गांवर देखील झाल्या असून सुरक्षेचा उपाय म्हणून म्हाळसकर यांनी ही मागणी केली आहे.

आळंदी देवाची याठिकाणी सालाबाद प्रमाणे कार्तिकी एकादशी मोठ्या आनंदात उत्साहात साजरी केली जाते. या कार्तिकी एकादशी निमित्त कोकण भागातून अनेक पायी दिंड्या येत असतात. गेल्या वर्षी कान्हे फाटया जवळील साते फाट्या जवळ (ता.मावळ) याठिकाणी पायी चालणाऱ्या दिंडीमध्ये पीकअप व्हॅन घुसली व अनेक वारकरी जखमी झाले. तर, काहींना प्राणास मुकावे लागले. त्याचप्रमाणे पंढरपूर येथे 4 नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी वारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील, करवीर तालुक्यातील जठारवाडी येथून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीत जुनोनी (ता.सांगोला) येथे मोटार घुसल्याने 31 ऑक्टोबरला दिंडीतील सात वारकरी ठार झाले. हा अनुभव घेऊन योग्य ती खबरदारी घेऊन त्यावर उपाययोजना कराव्यात.

RMK : दक्षिण आफ्रिकेच्या तज्ज्ञ शिष्टमंडळाची आरएमके क्रशर, सोलर युनिटला भेट

दरम्यान, आगामी काळात पायी दिंड्यांना मावळ तालुक्यातून जाणाऱ्या (Warkari News) राष्ट्रीय व राज्य महामार्गावर योग्य ते वाहतूक नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलीस संरक्षण देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.