MNS : मनसे मावळ इच्छुकांच्या मुलाखती संपन्न

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेना मावळ (MNS) तालुक्यातील रिक्त पदांसाठी इच्छुक असणाऱ्या तब्बल 50 उमेदवारांच्या चाचपणी मुलाखती बुधवारी (दि. 9) पार पडल्या. लोणावळा, कामशेत, वडगाव, तळेगाव, देहूरोड येथे या मुलाखती संपन्न झाल्या.

मुलाखतीसाठी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी हेमंत संभूस – सेक्रेटरी, (अध्यक्ष-स्थानिय जनाधिकार समिती, महाराष्ट्र प्रदेश), ॲड. किशोर शिंदे – ( सरचिटणीस, अध्यक्ष विधी व जनहित कक्ष महाराष्ट्र प्रदेश), ॲड. गणेशआप्पा सातपुते ( उपाध्यक्ष मनसे महाराष्ट्र), सचिन चिखले (शहर अध्यक्ष / गटनेते पिंपरी-चिंचवड ) उपस्थित होते.

मावळ तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली शहरी विभागातील शहराध्यक्ष व ग्रामीण विभागातील तालुका उपाध्यक्ष, तालुका संघटक या पदांसाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून मुलाखती दिल्या. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मावळ तालुका कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. यानंतर मावळ तालुका कोअर कमिटीच्या वतीने सर्व भागांमध्ये कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकी घेण्यात आल्या होत्या व तसा अहवाल तयार करून तालुका कार्यकारिणीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे (MNS) अर्ज मागविण्यात आले होते.

Warkari News : पायी दिंड्यांदरम्यान वाहतूक पोलिसांची नेमणूक करा

याच अनुषंगाने तालुका कोअर कमिटीने माध्यमातून चाचपणी व मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. येत्या काही दिवसातच राज ठाकरे यांच्या शुभ हस्ते निवडीचे पत्र देऊन तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असल्यामुळे इच्छुकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण या मुलाखतीदरम्यान पाहायला मिळाले. या प्रसंगी सचिन भांडवलकर, तानाजी तोडकर, सुरेश जाधव, संजय शिंदे आदि जण उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.