Alandi : कार्तिकी एकादशी निमित्त देहूनगरी भाविकांनी गेली फुलून

एमपीसी न्यूज – कार्तिकी एकादशी व श्री संत ज्ञानेश्वर महाराज (Alandi) संजीवन सोहळ्या निमित्त आळंदी व देहू नगरी भाविकांनी अक्षरशः फुलून गेल्या आहेत. उद्या शनिवारी (दि.९) रोजी कार्तिकी एकादशी निमित्त राज्यभरातून लाखो भाविक तीर्थक्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज व देहू येथील संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत.

कोकणातील भाविक पायी दिंड्या घेऊन आले असून ते श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन आळंदी कडे मार्गस्थ झाल्या आहेत. देहूत आलेल्या भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी देहू नगरपंचायत व श्री संत तुकाराम महाराज संस्थान भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे.

या भाविकांना यात्रा काळात कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीला सामोरे जावे लागु नये यासाठी देहू येथे नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने (Alandi) साफसफाई, धूर व डीडीटी फवारणी, पथदिवे दुरूस्ती व देखभाल , पिण्याचे पाणी, आदी कामे प्राधान्याने पुर्ण केली आहेत. मंदिरातील साफसफाईची कामे पुर्ण करण्यात आली आहेत.

Mulshi : टास्क पूर्ण करण्यास सांगून 52 लाखांची फसवणूक

पोलिसांकडूनही देहूनगरीत चोख बंदोबस्त –

पोलीसांच्या सहकार्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमणेही काढण्यात आली आहेत. मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिरातील सुरक्षारक्षक, दर्शन बारीची व्यवस्था आणि सी. सी. टीव्ही कॅमेरे सज्ज करण्यात आले आहेत.


यात्रे निमित्त वाहतूकीत बदल –

यात्रेच्या बंदोबस्तासाठी देहूमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त दाखल झाला आहे. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा यात्रेकरूनवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यात्रा काळात अवजड वाहने तळवडे शीव मारुती काळोखे चौक ते अनगडशहा वली दर्गा परंडवाल चौक या बाह्यवळण मार्गाने वळविण्यात आली आहे.

गावातील स्थानिकांची वाहने देखील यात्रा काळात सुरक्षित ठिकाणी ठेवावित असे अवाहनही पोलीसांच्या कडून करण्यात आले आहे जेणे करून वाहतुकीला अडथळा ठरणार नाही.

आज आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला होता. गावातील खाजगी बस वहातुक व प्रवासी वाहतुक बंद करण्य़ात आली आहे. यात्रेकरूची वाहने परंडवाल चौक, भैरवनाथ चौक, देहू आळंदी रस्त्यावरील मारुती काळोखे चौकात बाह्यवळण मार्गाने वळविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.