Maharashtra : 17 नंबर अर्ज भरण्यासाठी अतिविलंब शुल्कासह 20 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदतवाढ

एमपीसी न्यूज – राज्यात 2024 मध्ये फेब्रुवारी व मार्च (Maharashtra) महिन्यात होणाऱ्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसाठी भरण्यात येणारा 17 नंबर अर्ज अतिविलंब शुल्कासह 20 डिसेंबर 2023 पर्यंत भरता येणार आहे. याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जारी केले आहे.

2024 मध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांकडून नाव नोंदणीसाठी ऑनलाईन पद्धतीने 17 नंबर अर्ज मागविण्यात आले होते.

त्यासाठी अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यासाठी अंतिम मुदत जाहीर केली आहे. आता दि. 11 डिसेंबर ते दि. 20 डिसेंबर 2023 या कालावधीत अतिविलंब शुल्क भरून हा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

Alandi : कार्तिकी एकादशी निमित्त देहूनगरी भाविकांनी गेली फुलून

यासाठी प्रती विद्यार्थी, प्रतीदिन 20/- रुपये अतिविलंब शुल्क आकारण्यात येणार असून हा अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येणार आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे व संबंधित सूचना मंडळाच्या वेबसाईटवर मराठी व इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत. 10 वीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-ssc.ac.in आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांनी http://form17.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर भेट द्यावी असे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात (Maharashtra) आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.