Pune Railway : पुणे रेल्वे विभागात विशेष स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज : विशेष स्वच्छता मोहिमेचा (Pune Railway) दुसरा टप्पा पुणे रेल्वे विभागात 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान विविध स्थानके, स्थानक परिसर, डेपो, गाड्या, कार्यालये, देखभाल दुरुस्ती आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत आगार, फलाट, प्रसाधनगृहे, वेटिंग रूम, प्रदक्षिणा क्षेत्र, रेल्वे रुळ, रेल्वे वसाहती आदींची सफाई करण्यात येत असून विभागातील पुणे, शिवाजीनगर, कोल्हापूर, मिरज, सातारा, सांगली, कराड, चिंचवड, अनेक लहान आणि मोठी स्थानके व घोरपडी कोचिंग मेंटेनेंस कॉम्प्लेक्स, रेल्वे वसाहतींच्या आवारा सारख्या कामाच्या ठिकाणी सखोल साफसफाईचे काम केले जात आहे. कामांचे प्रत्यक्ष निरीक्षण देखील केले जात आहे.
विभागातील सर्व अधिकारी, स्थानकावर काम करणारे रेल्वे कर्मचारी, स्वच्छता कर्मचाऱ्यांचा या मोहिमेत सक्रिय सहभाग असून या कामांवर प्रत्यक्ष देखरेखही केली जात आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा, अतिरिक्त विभागीय रेल्वे (Pune Railway) व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विजयसिंह दडस यांच्या समन्वयाने विविध विभागांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.