Dighi : जीवे मारण्याची धमकी देत तरूणाला मारहाण

एमपीसी न्यूज –  बदनामी करणारा व्हिडीओ काढण्यास नकार दिला म्हणून जिवे मारण्याची धमकी देत तरुणाला लोखंडी रॉडने व कोयत्याने मारहाण करण्यात (Dighi) आली आहे. हा प्रकार दिघी येथे  बुधवारी (दि.26) घडला आहे.

मंगेश दिपक दिघे (वय 20 रा.दिघी) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अमर माने, सुरज एरंडे,ओम बोगाडे, कुंदनसिंग टाक सर्व राहणार दिघी तसेच त्यांचे सात ते आठ साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे त्यांच्या मित्र सुरजसिंग याच्यासह दुचाकीवरून जात होते. यावेळी आरोपी व त्यांचे साथीदार आडवे आले व गाडीची चावू फिरवून बंद केली. फिर्यादी यांना मारहाण होणार याचा अंदाज येताच ते पळून जाऊन लपले पण आरोपींनी तेथे जाऊन यांचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत मयूरबद्दल अपशब्द वापरण्यास सांगितले.

यावेळी फिर्यादी यांनी नकार दिला आरोपींनी कोयत्याने व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच गाडीची व मोबाईलची तोडफोड करत नुकसान केले. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा (Dighi) दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.