Pune news: मुंबई/पुणे आणि दानापूर दरम्यान विशेष गाड्या

एमपीसी न्युज : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे मुंबई/पुणे आणि दानापूर दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.

तपशिल खाली दिलेल्यानुसार:

मुंबई- दानापूर स्पेशल
03266 स्पेशल १० नोव्हेंबर २०२२ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सकाळी ००.१५ (मध्यरात्री 12.15) वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी ०८.०० वाजता पोहोचेल.

03265 विशेष गाडी ८ नोव्हेंबर २०२२ रोजी दानापूर येथून संध्याकाळी 6.10 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री 10.30 वाजता पोहोचेल.

थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

संरचना: दोन तृतीय वातानुकूलित, १६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय श्रेणी, लगेजसह गार्ड ब्रेक व्हॅन.

पुणे- दानापूर स्पेशल
03288 स्पेशल ९ नोव्हेंबर २०२२ रोजी पुणे येथून पहाटे ०५.०० वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.१५ वाजता पोहोचेल.

03287 स्पेशल ७ नोव्हेंबर २०२२ रोजी दानापूर येथून दुपारी 4.40 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी रात्री 10.30 वाजता पोहोचेल.

थांबे: दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.

संरचना: तीन द्वितीय वातानुकूलित, ९ शयनयान, ७ सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन द्वितीय श्रेणी, लगेजसह गार्ड ब्रेक व्हॅन.

आरक्षण: 03266 आणि 03288 विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग 6 नोव्हेंबर रोजी सर्व आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळ संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.