BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : चाकण आंदोलनातील युवकांवरील गुन्हे मागे घ्या

ठिय्या आंदोलनात मागणी

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस स्टेशन जवळील भैरवनाथ मंदिर येथे गुरुवारी (दि.९) भजन करून मराठा आरक्षण देण्याबाबत ठिया आंदोलन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शासनातर्फे शांततेचे आवाहन केले.

यावेळी जिल्हा काँग्रेस प्रवक्ते निलेश कड पाटील यांच्यासह मनोहर वाडेकर, अनिल (बंडू) सोनवणे, गणेश पर्हाड, अतिश मांजरे, राहुल नायकवाडी यांनी मागणी केली की मराठा आंदोलनात शिरून हिंसाचार करणाऱ्या प्रवृत्तींना कठोर शासन व्हावे. मात्र, निरपराधांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असल्यास ते गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत. संबंधित गुन्हे मागे कधी घेणार त्याबाबत विहित मुदत जाहीर करावी. तसेच चाकण येथे ३० जुलैला झालेल्या हिंसाचारास सरकार जबाबदार आहे.

मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घेण्यास टाळाटाळ झाल्यास पुन्हा असंतोष उफाळून येईल असा इशारा निलेश कड-पाटील यांनी दिला. गुन्हे मागे घेणेबाबत कमिटी गठीत केलेली आहे. कोणावर ही अन्याय होणार नाही आणि हिंसाचारात सहभागी झालेले कुख्यात सराईत गुन्हेगार यांना कडक शासन केले जाईल, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. तसेच शांततापूर्ण भजन आंदोलन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3