Talegaon : नवीन माथाडी संघटना निर्माण करण्यास विरोध केल्याने जातीवाचक शिवीगाळ

अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार संघटनेच्या सचिवासह सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एकाच कंपनीत काम करत असल्याने माथाडी कामगार संघटना (Talegaon)  निर्माण करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला काहींनी विरोध केला असता त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा प्रकार जुलै 2023 ते 11 नोव्हेंबर 2023 या कालावधीत तळेगाव एमआयडीसी मधील एका कंपनीत घडला.

याप्रकरणी अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार संघटनेचा सचिव कृष्णा आण्णा पाटील (वय 40), दीपक नामदेव तोडकर (वय 35, रा. सांगवी), अरुण रघुनाथ ढोरे (वय 40, रा. वडगाव मावळ), विकास विश्वनाथ तोडकर (वय 32, रा. सांगवी), अजित भरत आंद्रे (वय 25, रा. कामशेत, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 27 वर्षीय तरुणाने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : व्यावसायिक प्रगतीला सामाजिक कार्याची जोड द्यावी – अजित गुलाबचंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी नानोली(Talegaon) फाटा येथील एका कंपनीत कामाला आहेत. आरोपींनी नवीन माथाडी कामगार संघटना निर्माण करू असा प्रस्ताव फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांसमोर ठेवला. नवीन माथाडी कामगार संघटना तयार करण्यास फिर्यादी यांनी विरोध दर्शवला. या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना जातीवाचक बोलून शिवीगाळ केली. नग्नधिंड काढून पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी फिर्यादीस दिली.

काम करायचे असेल तर धर्माचरण करावे लागेल, अशीही धमकी दिली. 21 नोव्हेंबर रोजी फिर्यादी आणि त्यांचे दोन सहकारी कंपनीच्या आवारात झाडाखाली जेवण करत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या जेवणात पायाने माती उडवली. तसेच मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत (Talegaon) आहेत.

https://www.youtube.com/watch?v=j-CGNhN2SRE

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.