Talegaon Crime News : तरुणाजवळून लाख रुपयांचे अफिम जप्त

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे तरुणाकडून (Talegaon Crime News) अंमली पदार्थ विरोधी पथकाने 2 लाख रुपयांचे अफिम जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4) दुपारी शिक्षक सोसायटी, तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.

दिनेश रामेश्वर लाल जाट (वय 25, रा. तळेगाव दाभाडे. मूळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद कलाटे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

Pune News : बीएमसीसी च्या विद्यार्थ्यांनी गुरुश्री एस.जे यांच्याकडून घेतले एकाग्रतेचे धडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे मधील शिक्षक सोसायटीमध्ये राहणारा एकजण अफिम विक्री करीत असल्याची माहिती अंमली पदार्थ (Talegaon Crime News) विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दिनेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख पाच हजार 600 रुपयांचे 514 ग्रॅम अफिम, 14 हजारांचा मोबाईल फोन आणि 55 हजारांची दुचाकी असा एकूण दोन लाख 74 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला.

दिनेश याने अफिम त्याच्या गावाकडील साथीदार दीपक सुथार (रा. बडीसादरी, जि. चितोडगड, राजस्थान) यांच्याकडून आणला होता. हा अफिम दिनेश तळेगाव दाभाडे परिसरात विक्री करणार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.