Pune News : बीएमसीसी च्या विद्यार्थ्यांनी गुरुश्री एस.जे यांच्याकडून घेतले एकाग्रतेचे धडे

एमपीसी न्यूज –बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामध्ये (BMCC) नुकतेच गुरुश्री एस.जे यांचे ‘एकाग्रता’ या विषयावर टाटा हॉल मध्ये सेशन झाले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी (Pune News) या सेशनचा लाभ घेतला.

एकाग्रता” ही जीवनशैली आहे आणि प्रत्येकजण या शैलीनुसार कसे जगू शकतो हे गुरुश्री एस.जे. यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन सांगितले. ही जीवनशैली अंगिकारली तर फक्त अभ्यासासाठी एकाग्रता आणावी लागत नाहीतर आपले (Pune News) प्रत्येक काम आपण एकाग्रतेने करू शकतो. गुरुश्रीनी विद्यार्थ्यांना रोज काय केले पाहिजेकोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेतआपण आपल्या कृतीद्वारे काय संदेश आपल्या मनाला देतोआपल्या प्रत्येक कृतीचा आपल्या मनावर काय आणि कसा परिणाम होतोया सर्व गोष्टी विद्यार्थ्यांसमोर अलगद उलगडल्या.

 

Mhanluge Crime News : म्हांळुगे येथून दोघांना गांजासह अटक

 

विविध गोष्टींमधूनकॉन्सन्ट्रेशन” आणि डिस्ट्रॅक्शन” यातील फरक समजावून सांगितला. कॉन्सन्ट्रेशन”केल्यावर होणारे फायदे माहित असतील तर लक्ष विचलित होऊच शकत नाही हे विद्यार्थ्यांना समजतील अशा उदाहरणातून समजावून सांगितले. या विषयाकडे बघण्याचा असा दृष्टिकोन प्रथमच मिळाल्यामुळे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले होते.

 

गुरुश्रींच्या एकाग्रता” वाढवायच्या क्लृप्त्या ऐकून आणि आपण एकाग्रता वाढवण्यासाठी काय बदल स्वतःमध्ये करायचे असतात हे समजल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास दिसत होता. सेशन नंतर विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे अभिप्राय दिला. विषय समजल्यामुळे या क्लृप्त्या आता दैनंदिन जीवनात नक्कीच वापरल्या जातीलतसेच गुरुश्रींचे मार्गदर्शन हे अभ्यासाबरोबरच उत्तम आयुष्य जगायला उपयोगी (Pune News) ठरणार आहे. असे अभिप्राय देताना विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लांजेकर यांनी गुरुश्रींचे विशेष आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.