Mhanluge Crime News : म्हांळुगे येथून दोघांना गांजासह अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Mhanluge Crime News) दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पावणेदोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4 ) सायंकाळी साडेसहा वाजता म्हाळुंगे-नांदे रोडवर म्हाळुंगे येथे करण्यात आली.

 महादेव निवृत्ती मंडलिक (वय 51, रा. थेरगाव), विनोद बिजयपाल सिंग (वय 38, रा. म्हाळुंगे, ता. मुळशी. मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहायक फौजदार महेश वायबसे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pimpri News : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने लादलेला शास्तीकर युती सरकारने माफ केला; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार होणार

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळुंगे-नांदे रोडवर दोघेजण गांजा विक्रीसाठी आले असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पिशवीची झडती घेतली असता त्यात 43 हजार 250 रुपयांचा एक किलो 730 ग्रॅम गांजा आढळून आला. दोघेजण हा गांजा विक्रीसाठी आले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.