Bhosari Crime News : विजबिल भरण्याच्या बहाण्याने पावणेदोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज-महावितरण मधून बोलत असल्याचे सांगून वीजबिल भरण्याच्या (Bhosari Crime News ) बहाण्याने स्क्रीन शेअर करण्यास भाग पाडत महिलेची पावणेदोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार 14 फेब्रुवारी रोजी दुपारी भोसरी येथे घडला.

याप्रकरणी 46 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Crime News : तरुणाजवळून लाख रुपयांचे अफिम जप्त

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन केला. फोनवरील व्यक्तीने तो महावितरण मधून बोलत असून फिर्यादीचे वीजबिल थकले आहे. बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे फसवे संदेश पाठवले.

 

संदेशातील लिंकद्वारे क्विक सपोर्ट नावाचे स्क्रीन शेअरिंग अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्याआधारे फिर्यादीच्या बँक खात्याचे तपशील आरोपीने मिळवले आणि फिर्यादीच्या बँक खात्यातून एक लाख 75 हजार 570 रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले (Bhosari Crime News ) आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.