PCMC : शहरातील रस्ते खोदकामास 15 मे पर्यंत परवानगी

एमपीसी न्यूज –  महापालिकेचा पाणी पुरवठा विभाग, फायबर नेटवर्किंग, महावितरण, एमएनजीएची पाइपलाइन टाकणे यासह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात रस्ते खाेदाई जाेरात सुरू आहे. महापालिकेने 15 मे पर्यंत रस्ते खाेदाईला परवानगी देण्याचा( PCMC ) विचार सुरू केला आहे. त्यानंतर फक्त अत्यावश्यक बाब म्हणून रस्ते खाेदाईला परवानगी दिली जाणार आहे. मात्र, त्यानंतर  खोदकाम केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसाळ्यात रस्त्याची होणारी दुरवस्था लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Chinchwad : दुर्दैव सोसण्याची शक्ती म्हणजे भक्ती – ह. भ. प. श्रेयस बडवे

महापालिकेचे स्थापत्य, विद्युत पाणीपुरवठा, ड्रेनेज तसेच, स्मार्ट सिटी कंपनी, नेटवर्किंगच्या खासगी कंपन्या, एमएनजीएल व इतर सरकारी संस्था विविध सेवावाहिन्या आणि केबल टाकण्यासाठी रस्ते व पदपथ खोदतात. खोदकाम करून भूमिगत सेवाहिनी टाकली जाते. खोदकामानंतर व्यवस्थित दुरूस्ती न केल्याने पावसाळ्यात खड्डे पडतात. तसेच, पावसाच्या तोंडावर खोदकाम केल्याने रस्ते खराब होऊन खड्ड्याचे प्रमाण वाढते.

विविध सेवा वाहिन्यांच्या कामासाठी वारंवार केले जाणारे खोदकाम आणि त्यानंतर केल्या जाणा-या दुय्यम दर्जाच्या रस्ते दुरूस्तीमुळे शहरातून वाहने चालविणे अवघड होते. त्यामुळे लहान-मोठे अपघात होतात. ते टाळण्यासाठी शहरातील मुख्य रस्ते आणि अतिवर्दळीच्या रस्त्यांवरील जलवाहिन्या, ड्रेनेजलाइन, पावसाळी गटारे, इंटरनेट व अन्य केबल, एमएनजीएल तसेच, वीज वाहिन्यांची कामे येत्या 15 मे पर्यंत पूर्ण करावीत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानंतर खोदकामास परवाना दिली जाणार नाही. फक्त अत्यावश्यक बाब म्हणून काही कामांसाठी रस्ते खाेदाईला परवानगी दिली जाणार आहे.

रस्ते दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार

शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या सूचना संबंधित अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात कोणत्याही कामासाठी रस्ते व पदपथ खोदकामास परवानगी दिली जाणार नाही. केवळ अत्यावश्यक आणि अतितातडीच्या कामांना अटी व नियम टाकून परवानगी दिली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

विनापरवाना खोदकाम केल्यास फौजदारी

सध्यस्थितीत शहरातील विविध भागात जलवाहिन्या टाकणे, फायबर नेटवर्किंगसह आदी कामांसाठी रस्ते खाेदाई सुरू आहे. दरवर्षी 15 मे पर्यंत रस्ते खाेदाईस परवानगी दिली जाते. यावर्षी अद्याप परवानगी कधीपर्यंत द्यायची हे ठरविले नसले तरी कामांची गरज पाहून परवानगी देण्यात येणार आहे. पावसाळ्यात कोणालाही रस्ते व पदपथ खोदाईस परवानगी दिली जाणार नाही. विनापरवाना खोदकाम केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई तसेच, फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार ( PCMC ) आहे.

मकरंद निकम,शहर अभियंता

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.