Talegaon-Dabhade Visarjan : गणपती विसर्जन मिरवणूकां वेळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज : गणपती विसर्जन मिरवणूकांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने कळविले आहे.(Talegaon-Dabhade Visarjan) हे वाहतूक बदल उद्या मंगळवारी 6 सप्टेंबरला दुपारी 2 ते बुधवारी पहाटे 2 वा. पर्यंत लागू असतील.

तळेगाव वाहतूक विभागाच्या हद्दीत तळेगाव शहर व लगतच्या परिसरातील गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघणार असल्याने तळेगाव- चाकण रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी तसेच वाहतूक कोंडी निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.(Talegaon-Dabhade Visarjan) त्यामुळे आनंद भोईटे, पोलीस उप आयुक्त, वाहतूक शाखा पिंपरी-चिंचवड शहर यांनी वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्याचे आदेश दिले आहेत.  फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, व रुग्णवाहिका इत्यादी वाहनांना हे नियम लागू नसतील.

Pune news : मांजरी येथील नकली पनीर कारखान्यावर कारवाई

तळेगाव ते चाकण रोडवर सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल. या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा..(Talegaon-Dabhade Visarjan) या वाहनांनी तळेगाव एमआयडीसी फाटा- नऊ लाख उंबरे – शिंदे वासुवली आंबेठाण चौकी मार्गे इच्छित स्थळी जावे. हे वाहतूक बदल उद्या मंगळवारी 6 सप्टेंबरला दुपारी 2 वा ते बुधवारी पहाटे 2 वा. पर्यंत लागू असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.