Gauri Ganpati decoration : पुनम गाढवे यांच्या नागपंचमीच्या देखाव्याला गौरी गणपती सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत पुनम सागर गाढवे यांच्या “नागपंचमी सण” या देखाव्यास प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले. शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी आयोजित (Gauri Ganpati decoration) केलेल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कौस्तुभ नवले यांच्या हस्ते विजेत्यांच्या घरी जाऊन करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख व पदाधिकारी उपस्थित होते.

पुनम गाढवे यांच्या नागपंचमी देखाव्यास प्रथम क्रमांक रोख तीन हजार रुपये, द्वितीय क्रमांक सुनिता किशोर चव्हाण यांना दोन हजार रुपये तर तृतीय क्रमांक पूजा सतीश गायकवाड यांना बक्षीस एक हजार रुपये देऊन गौरविण्यात आले. इतर पंधरा उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.(Gauri Ganpati decoration) सर्व सहभागी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाचे परीक्षक म्हणून युवक काँग्रेस शहर सरचिटणीस विनिता तिवारी तसेच मृणालिनी मोरे यांनी काम पाहिले.

Talegaon-Dabhade Visarjan : गणपती विसर्जन मिरवणूकां वेळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल

पूनम गाढवे यांनी नागपंचमी हा पारंपारिक सण देखावा सादर केला होता यामध्ये त्यांनी गौरी गणपती सह इतर काही पर्यावरण पूरक मूर्ती व साहित्याचा वापर करून उत्कृष्ट देखावा सादर केला होता.(Gauri Ganpati decoration) तसेच द्वितीय क्रमांक सुनीता चव्हाण यांनी कमी जागेत अतिशय सुंदर आरास उभारली होती, तर तृतीय क्रमांक विजेत्या पूजा गायकवाड यांनी घरी बनवलेल्या गणपतीची स्थापना केली होती. तसेच पर्यावरण पूरक साहित्य वापरून देखावा सादर केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.