Talegaon Dabhade : इंद्रायणी बी फार्मसी महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी. फार्मसी) महाविद्यालयामध्ये (Talegaon Dabhade) शनिवारी (दि. 24) प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त निरूपा कानिटकर व इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Today’s Horoscope 27 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय आरोटे यांनी केले तर प्रा. गणेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा आलेख पालकांसमोर मांडला.

निरूपा कानिटकर यांनी संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील आहे हे सांगितले. चंद्रकांत शेटे यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल ही विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कार्यरत राहील अशी ग्वाही दिली. पालकांनीही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा वेळोवेळी आढावा घ्यावा असे डॉ. संजय आरोटे यांनी सांगितले.

कार्यक्रमाला पालकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सर्व नियोजन वर्ग शिक्षिका प्रा.कादंबरी घाटपांडे व सूत्रसंचालन प्रा. पूजा कुंभार यांनी केले आणि पालक मेळाव्याचे महत्व सांगितले. आलेल्या सर्व पालकांचे स्वागत प्रा. शारदा कुलकर्णी आणि प्रा. भवानी राकेश यांनी केले. प्रा. प्रियांका पानमंद यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाहक चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष शैलेश शहा, विश्वस्त निरुपा कानिटकर यांनी शुभेच्छा (Talegaon Dabhade) दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.