Today’s Horoscope 27 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 27 June 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – मंगळवार.

27.06.2023.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष- साधारण दिवस.

राहू काळ – दुपारी 3.00  ते 4.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आजचे नक्षत्र – हस्त 14..43 पर्यंत नंतर चित्रा.

चंद्र राशी – कन्या.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

कलेशी निगडित क्षेत्रातील मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी आज तुम्हाला त्रस्त करतील. आज संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता )

कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना नाकी नऊ येतील. मुले अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची उठबस हसतमुखाने करतील.

मिथुन ( शुभ रंग- मरून)

सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूंना आवर्जून मदत कराल. गोड बोलून इतरांची मने जिंकाल. आज काही शुभ समाचार येणार आहेत.

कर्क (शुभ रंग- पांढरा)

आवक पुरेशी असल्याने आज तुम्ही मनासारखा खर्च करू शकाल. क्षुल्लक कारणावरून शेजारी रुसून बसण्याची शक्यता आहे. आज जरा स्पष्ट वक्तेपणास आवर घालावा अन्यथा नाती दुरावतील.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी )

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. उतावीळपणाने घेतलेले काही निर्णय चुकतील. हातसे सोडून पळत्याच्या मागे धावण्याचा प्रयत्न करू नका.

कन्या ( शुभ रंग- सोनेरी)

एखादी हरवलेली वस्तू आज सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल. घरात थोरामोठ्यांच्या होला हो करा आणि वाद आवरते घ्या.

तूळ ( शुभ रंग- चंदेरी)

आज तुमच्या अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. अधिकारी वर्गास विदेश दौरे घडतील. हातचे सोडून मृगजळा मागे धावणार आहात महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल.

वृश्चिक (शुभ रंग- डाळिंबी)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आज तुमच्या कामाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. आज कामाच्या व्यापात घरगुती समस्या दुर्लक्षित होणार आहेत.

धनु- (शुभ रंग- हिरवा)

काही मनाविरुद्ध घटनांनी नैराश्य येईल. कार्यक्षेत्रात नवे उपक्रम सुरू करण्यासाठी आज दिवस योग्य नाही. वैवाहिक जीवनात आज सौम्य मतभेद संभवतात.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी)

आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. नास्तिकही आज देवाला एखादा नवस बोलतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे बेत कराल. दैवाची उत्तम साथ राहील.

कुंभ (शुभ रंग – गुलाबी )

व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. आज अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ असेल. कुटुंबास आज तुम्ही पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

मीन -(शुभ रंग – भगवा )

धंद्यातील रखडलेली येणी वसूल होतील. गोड गोड बोलून आज तुम्ही आपल्या विरोधकांनाही आपलेसे कराल. जुनी दुखणे अंगावर काढू नका. आज विश्रांतीची ही तुम्हाला गरज आहे.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.