Talegaon Dabhade : तळेगाव मध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय चर्मकार महासंघ तळेगाव दाभाडे यांच्यावतीने संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती ( Talegaon Dabhade) साजरी करण्यात आली. शनिवारी (दि. 24) साजरी झालेल्या जयंती सोहळ्यात व्याख्यान आणि समाजातील बांधवांचा गौरव समारंभ करण्यात आला.

यानिमित्ताने प्रमुख पाहुणे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते माजी राज्यमंत्री ज्ञानेश्वर कांबळे नगरसेवक अरुण माने खादी ग्रामोद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष अंकुश आंबेकर दिनेश जाधव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्परार व महाआरतीने सुरुवात झाली.

Maratha Reservation : दहा टक्के आरक्षणाचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणारा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाज प्रबोधनकार  सुधाकर अभंग यांच्या व्याख्यानाने सुरुवात झाली जयंतीच्या निमित्ताने समाजातील विविध मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. ज्ञानेश्वर कांबळे यांनी आपल्या मनोगतामध्ये समाजातील नागरिकांसाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबवले जात आहे त्या मार्फत त्याचा लाभ घ्यावा समाजातील इतर मान्यवरांनी दीनदुबळ्या नागरिकांसाठी सदैव मदत करण्यात  राहील.

भविष्यामध्ये तळेगाव मध्ये श्री संत शिरोमणी रविदास महाराजांचे भव्यस्मारक वाढण्यात येईल असे देखील सांगण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश देव माने, दत्तात्रय शेळके, भगवान वाघमारे, भीमराव बोरसे, सखाराम जगताप,अंकुश गाजरकर, मंगेश चव्हाण, रामभाऊ भोसले, देवीचंद खरादे, सुरेश भोसले, दादाराव कांबळे, श्री राम जाट, सुनील शिंदे  बाळकृष्ण कांबळे, गणेश कांबळे आदींनी विशेष ( Talegaon Dabhade)  परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.