Talegaon Dabhade : शिवाजी महाराज एक चारित्र्य संपन्न शासनकर्ते -प्रा. सोमनाथ गोडसे

शिवजयंतीनिमित्त सिध्दांत ग्रृप आॅफ इंस्टिट्यूट येथे मिरवणूक, व्याख्यानाचे आयोजन

एमपीसी न्यूज – “छत्रपती शिवराय हे एक चारित्र्य संपन्न शासनकर्ते होते. त्यांच्या चारित्र्य संपन्नतेमुळेच स्वराज्याचे देखणं स्वप्न पुर्ण होऊ शकले” असे शिवव्याख्याते प्रा.सोमनाथ गोडसे म्हणले. विद्यार्ध्यांच्या पुढाकाराने सिध्दांत ग्रृप आॅफ इंस्टिट्यूट, सुदुंबरे येथे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

यंदा अनावश्यक डीजेचा खर्च टाळून विद्यार्ध्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुलवामा येथे झालेल्या भ्याड अतंकवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात आली आणि डीजेरहित मिरवणूक काढली. मिरवणुक सकाळी दहा वाजता सुरू झाली सर्वप्रथम सर्व विद्यार्ध्यी वर्ग आणि शिक्षकांनी शहिद जवानांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर मिरवणूक सुरू झाली. शिवयोध्दा आणि मृत्युंजय या दोन ढोल-ताशा पथकांनी वादन सादर केले. विशेष अाकर्षण म्हणजे मर्दानी खेळांचे प्रात्यक्षित सादर झाले.

  • संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र यादव, संस्थेचे कार्यकारी संचालक जी. एम. देशमुख प्रमुख पाहुणे होते. यावेळी प्रा.डाॅ.जागृती पांचाळ, प्रा. नंदा कुलकर्णी, प्रा.डॅा.राहुल डुंबरे, डाॅ. सागर मांजरे, प्रा. भागवत केदार, प्रा. उत्तम शिंदे, प्रा. भरत देशमुख (सिव्हिल), प्रा.शिशिर देशमुख (मेकॅनिकल), डाॅ. ब्रिजेंद्र गुप्ता (कम्पुटर), प्रा.भातलवंडे (ई अॅन्ड टीसी) उपस्थित होते. प्रा.डॅा. पांचाळ यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी सर्व विद्यार्थी वर्गाच्या वर्गणितुन महाविद्यालयाच्या वाचनालयास शिवाजी महाराजांच्या अष्टपैलुंवरिल आधारित पुस्तके भेट दिली.

यावेळी कार्यक्रमाचे संयोजक अमित शेलार म्हणले “फुलवामा येथिल झालेल्या आतंतवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण भारत देशाच्या तरुणांचे विचार सुधारावेत ही काळाची गरज आहे, हे फक्त शिवरायांच्या चरित्रातुन होऊ शकते, त्यामुळे हा फुस्तक वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला.

  • कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संकेत पवार व रोहित बुट्टे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रितेश अल्हाट, ऋतिक गाडे, स्वप्निल वाळके, गणेश आवटे, मयुर येळवंडे, धिरज कोलगे, दर्शन गौर, विजय घाडगे, ओंकार जाधव, या विद्यार्थी संयोजकांनी केले व आभारप्रदर्शन अमित शेलार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.