Talegaon Dabhade : दारुंब्रे येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण

खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांची प्रमुख उपस्थिती

एमपीसी न्यूज – दारुंब्रे गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण आणि लोकार्पण अतिशय शिवमय वातावरणात खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अध्यक्ष नानासाहेब नवले, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी उपनगराध्यक्ष सुनिल अण्णा शेळके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले, नगरसेवक संतोषभाऊ भेगडे, संजय बो-हाडे, दत्ता माळी माजी पंचायत समिती सदस्य आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

  • यावेळी शिवभक्त सौरभ करडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ढोल, ताशा, लेझिमच्या गजरात विविध कार्यक्रमांनी दारूंब्रे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळयांच्या पराक्रमाची आठवण जागी राहावी, या उद्देशाने दारूंब्रे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहभागातून गावातील छत्रपती चौकात राजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. त्याचे अनावरण युवराज संभाजीराजे यांचे हस्ते करण्यात आले.

  • सरपंच सोमनाथ वाघोले, माजी सरपंच पै राजेश वाघोले, उपसरपंच किरण वाघोले, विजय वाघोले, गणेश वाघोले आणि ग्रामपंचायत दारूंब्रे मावळ यांनी याचे आयोजक म्हणून काम पहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.