Chinchwad : ”शिवतांडव’ या ऐतिहासिक नाटकाचा  शुभारंभ,  37 कलावंत 9 गाण्यांचा समावेश असलेले भव्यदिव्य नाटक

एमपीसी न्यूज –  भगव्या ध्वजाने नटलेला प्रा . रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचा ( Chinchwad) परिसर, नाट्य रसिकांच्या स्वागताला सनई चौघडे, तुतारी अशा प्रकारच्या मंगलमय वातावरणात शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘ शिवतांडव’  या भव्य नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मोरया गोसावी गणेशाच्या आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या साक्षीने मोठ्या दिमाखात पार पडला. पहिल्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘ शिवतांडव’ या नाटकातून महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास मराठी रंगमंचावर उलगडणार आहे. भाऊसाहेब भोईर यांच्या मोरया थिएटर्सने या भव्यदिव्य नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचे  दिग्दर्शक दिलीप भोसले असुन ज्येष्ठ लेखक प्रताप गंगावणे यांनी नाटकाचे लेखन केले, रोहित नागभिडे यांचे संगीत आहे. नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे असून सूत्रधार राजु बंग,भैरवनाथ शेरखाने आहेत. तर सुप्रसिद्ध अभिनेता शंतनु मोघे  छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहेत.

Pune : शासकीय तंत्रनिकेतनचा 24 वा पदविका प्रदान समारंभ 3 एप्रिल रोजी

तसेच नाटकात तब्बल 37 कलावंत आहेत, यामध्ये 9 गाणी असून प्रत्येक गाणे हे कथेला पुढे घेऊन जाणारे आहे. या नाटकाचे शीर्षक गीत मानसी धुले – भोईर यांनी गायले आहे. कव्वाली, लावणी, भजन अशी वैविध्यपूर्ण गाणी यात आहेत तसेच एक रॅप साँग देखील प्रेक्षकांना ऐकायला मिळते. भव्य नेपथ्य, उत्तम संगीत,  काळजाचा ठाव घेणारी गाणी आणि दमदार संवाद या नाटकाच्या जमेच्या बाजू ( Chinchwad)आहेत.

याप्रसंगी बोलताना नाटकाचे निर्माते भाऊसाहेब भोईर म्हणाले, चित्रपट, नाटकाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना काहीतरी वेगळे देण्याचा मोरया थिएटर्सचा नेहमी प्रयत्न असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आजच्या पिढीला दाखवण्यासाठी आम्ही ‘शिवतांडव’ ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. 7 महिन्या पासून नाटकाची तयारी सुरू आहे. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगा आधीच राज्याच्या विविध भागातून प्रयोगासाठी विचारणा होत आहे. आज हे नाटक बंदिस्त नाट्यगृहात सादर केले जात असले तरी या नाटकाचे प्रयोग खुल्या मैदानात महानाट्य म्हणून देखील आम्ही करू शकतो त्यासाठी नेपथ्य, प्रकाश योजना वेगळी असेल तसेच त्यामध्ये 70 हून अधिक कलावंत असतील असेही भोईर यांनी ( Chinchwad) सांगितले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.