Talegaon Dabhade : अनुभवातून विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे – प्रीतम माहुरे

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या (Talegaon Dabhade) बीबीए बीसीए विभागाच्या वतीने प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ नुकताच संपन्न झाला. यानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयाच्या बीबीए, बीसीए विभागाच्या वतीने ‘लाईफ लेसन’ हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सीए प्रीतम माहुरे यांनी मार्गदर्शन केले. आयुष्यात अनुभवातून मिळणारे धडे आपल्याला संघर्षाची सकारात्मकता प्रदान करीत असतात. याचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व अधिक समृद्ध करावे असे माहुरे यांनी सांगितले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाहक चंद्रकांत शेटे, विश्वस्त संजय साने,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे, बीबीए- बीसीए विभागप्रमुख प्रा विद्या भेगडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे म्हणाले की, आज स्पर्धेच्या युगात वेगवेगळ्या नवीन विद्या शाखा येत असून A I या शाखेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा लागणार आहे.

Chinchwad : जुन्या भांडणातून तरुण व त्याच्या पत्नीला मारहाण

बीबीए – बीसीए विभागातील विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी इंद्रायणी महाविद्यालयाकडून (Talegaon Dabhade) त्यांना आवश्यक ते अभ्यासक्रम उपलब्ध करून देत असून प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यी रोजगारासाठी स्वतःच्या पायावर उभे राहत आहे असे काकडे यांनी सांगितले.

स्वागत व प्रास्ताविक बीबीए, बीसीए विभागप्रमुख प्रमुख विद्या भेगडे यांनी केले. सूत्रसंचालन स्नेहल मसुरकर तर आभार योगिता दहिभाते यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.