Talegaon Dabhade : घरात आलेल्या विषारी नागाला सोडले नैसर्गिक अधिवासात

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कोटेश्वरवाडी येथे अजित ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या (Talegaon Dabhade)घरात बुधवारी (दि. 18) विषारी जातीचा नाग आढळला. त्याला सर्पमित्र प्रशांत भालेराव, गणेश सोंडेकर, रोहित दाभाडे यांनी पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

सध्या ऑक्टोबर हिट सुरु असल्याने अनेक सर्प थंड जागेच्या शोधात येत असतात. त्यांना कोणतीही इजा न करता सर्पमित्र अथवा वनविभागाला माहिती देऊन त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले.

Pune : फुड डिलीव्हरी एजंट्स कॅब व रिक्षा चालकांचा 25 ऑक्टोबर रोजी संप

सध्या कडक ऊन पडत असल्याने अनेक सर्प हे थंड जागेच्या शोधार्थ अनेक (Talegaon Dabhade)घरांमध्ये आढळून येत असतात. कोटेश्वरवाडी येथील रहिवासी अजित ज्ञानेश्वर दाभाडे यांच्या घरी सायंकाळी साधारण पाच वाजता घरातील दरवाजाच्या वर एक विषारी जातीचा नाग त्यांना आढळून आला असता त्यांनी सर्पमित्र प्रशांत भालेराव यांना फोन केला.

घरात विषारी नाग आहे अशी माहिती कळताच प्रशांत भालेराव यांनी आपले सहकारी मित्र गणेश सोंडेवर व रोहित दाभाडे यांना कळवून घटनास्थळी धाव घेतली.त्या ठिकाणी पाहणी केली असता त्यांचा घराच्या दरवाजावर नाग जातीचा साप बसलेला दिसला प्रसंगावधान राखत सर्पमित्रांनी त्या नागास व्यवस्थित पकडुन निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले.

योग्य वेळी सर्पमित्रांनी त्या ठिकाणी धाव घेतली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. आपल्या पत्र्याच्या वरती कुठेही फट राहणार नाही किंवा आजूबाजूला अन्न व खरकटे टाकू नये त्यामुळे उंदीर येतात व जर उंदीर आल्यानंतर सापही त्याच्या मागे भक्ष्य शोधण्यास घरामध्ये येत असतात.

आपल्याला धोका उत्पन्न होऊ शकतो अशी माहिती सर्पमित्र प्रशांत भालेराव यांनी तेथील घरातील व्यक्तींना दिली तसेच काही अशा घटना आढळल्यास त्वरित सर्पमित्रांना बोलवावे असे देखील त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना सांगितले आहे.

सर्पमित्रांनी वेळेवर केलेली मदत पाहून तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था चांगली काम करत आहे व अनेक वेळा रात्री बे रात्री सुद्धा मदत करत आहात याबद्दल दाभाडे कुटुंबियांनी मनापासून त्यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.