Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटीत साडेतीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटीमध्ये बंद फ्लॅटचे लॅच (Talegaon Dabhade) तोडून घरातून सुमारे साडेतून लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे.

याप्रकरणी संग्राम उदय राजेश शिर्के (वय 30 रा.तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Navlakh Umbre : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा मंत्रा सिटी येथे  फ्लॅट आहे. चोरट्यांनी घराचे लॅच तोडून घरात प्रवेश केला. घरातूल कपाटातून 2 लाख 45 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. यावरून तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Dabhade) ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.