Chakan : चाकण परिसरात अवकाळीने दाणादाण

एमपीसी न्यूज – चाकण परिसरात अवकाळी पावसाने शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी जोरदार (Chakan ) हजेरी लावली आहे.सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.  सकाळपासून वातावरणात देखील बदल झाला होऊन उन्‍हाची तिव्रता कमी होवून ढगाळ वातावरण झाले होते. सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली.  या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकाला देखील फटका बसण्याची दाट भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

कांद्याला फटका 
शनिवारच्या बाजाराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.7) सायंकाळी चाकण मध्ये शेतकर्यांनी कांदा आणला. मात्र अचानक आलेल्या पावसाने हा कांदा भिजून मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

 

तारा तुटल्या; पथदिवे कोसळले 

 वाघजाईनगर भागात प्रवाहित वीज वाहक तारा तुटून पडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. चाकण मधील (Chakan ) दावडमळा भागात चाकण पालिकेने बसवलेला सौर ऊर्जेवरील पथदिवा सोसाट्याच्या वार्यामुळे कोसळून दोन चारचाकी मोटारींचे नुकसान झाले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.