Chakan News : चाकण परिसरात भेसळयुक्त सिमेंटचा गोरखधंदा

एमपीसी न्यूज –  बिर्लासुपर या नामांकित (Chakan News) कंपनीच्या सिमेंटच्या पोत्यांमध्ये भेसळयुक्त सिमेंट भरून त्याची विक्री करण्यासाठी चाकण जवळील कडाचीवाडी ( ता. खेड )  येथे विक्रीसाठी आणण्यात आलेल्या एका टेम्पो मधील सुमारे 200 सिमेंटची पोती व ट्रक स्थानिक नागरिक, व्यापारी यांच्या मदतीने चाकण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. सदरची घटना शुक्रवारी (दि. 7) दुपारी 12 च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी चौकशी व गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

चाकण परिसरात बिर्लासुपर कंपनीच्या सिमेंटच्या पोत्यांमध्ये भेसळयुक्त सिमेंट भरून त्याची विक्री सर्रास होत असल्याच्या प्रकारांचा यामुळे पर्दाफाश झाला आहे. या बाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी कळवले आहे. फसवणूक व कॉपीराइट व ट्रेडमार्क कायद्याला वाकुल्या दाखवत राजरोज हा गोरखधंदा सुरु आहे . बनावट सिमेंट किरकोळ सिमेंट खरेदी करणाऱ्यांना विकत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. अशा बोगस सिमेंट वापरामुळे इमारती धोकादायक पद्धतीने उभ्या राहत असल्याचे बिल्डींग मटेरीअल असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी सांगितले आहे.

Chakan : चाकण परिसरात अवकाळीने दाणादाण

या व्यवसायातील व्यापाऱ्यांच्या मते हलक्या दर्जाच्या कंपनीचे सिमेंट हे बिर्ला सुपर कंपनीच्या पोत्यांमध्ये भरून विक्री करण्यात येत आहे. 370 रुपयांचे एक पोते 320 रुपयांना विक्री होत होते.  भेसळयुक्त सिमेंट बाजार भावापेक्षा 50 रुपये कमी किमतीने विक्री करण्यात येत आहे. संबंधितांचे मोठे जाळे असण्याची शक्यता व्यक्त होते आहे. हे संपूर्ण प्रकरण दडपण्यासाठी काही मंडळींनी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. पकडण्यात आलेला बोगस माल म्हणजे हिमनगाचे टोक असून खूप मोठ्या प्रमाणावर याची व्याप्ती असल्याची बाब समोर येत आहे.  आतापर्यंत संबंधितानी कोणाला व किती सिमेंटची विक्री केली याबाबत चौकशी सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.