Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश स्कूलमध्ये सर्प जागरूकता विषयावर कार्यशाळा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘सर्प जागरूकता’ या विषयावर (Talegaon Dabhade) दि 2 सप्टेंबर 2023 रोजी कार्यशाळा घेण्यात आली. कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘वन्यजीव रक्षक मावळ’ संस्थेद्वारे वन्यजीव असलेल्या सापाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली. सापांच्या प्रजाती, साप चावल्यानंतर घेण्याची काळजी, प्रथमोपचार आदिंविषयी माहिती देत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

Talegaon Dabhade : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेत शिक्षक दिनाचे आयोजन

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर, वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे,संस्थापक निलेश संपतराव गराडे, संस्थेचे सहकारी भास्कर माळी, प्रशांत भालेराव उपस्थित होते.

भास्कर माळी,अनिल आंद्रे यांनी महाराष्ट्रात असलेली सापांची संख्या, विषारी साप, बिनविषारी साप, निम विषारी साप कोणते, या विषयी माहिती दिली. तसेच सापांविषयी लोकांमध्ये असलेल्या गैरसमजुती याविषयी देखिल विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

साप चावल्यानंतर कोणते प्रथमोपचार करावेत, यावरही मार्गदर्शन केले. यावेळी (Talegaon Dabhade) विद्यार्थ्यानी सापांविषयी असलेले प्रश्न विचारले व यावर सापांसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. शेवटी वन्यजीव रक्षक दलाने विध्यार्थ्यांना प्रश्न विचारले . योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेद्वारे प्रशस्तीपत्रक देण्यात आले.

विद्यार्थ्यानी या कार्यशाळेत उस्फुर्तपणे सहभाग घेतला. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका क्रांती कडू यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.