Talegaon Dabhade : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेत शिक्षक दिनाचे आयोजन

एमपीसी न्यूज – इंद्रायणी (Talegaon Dabhade) विद्या मंदिर संस्थेच्या वतीने संस्थेच्या कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात शिक्षक दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 5) सकाळी साडेदहा वाजता ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे. यावेळी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे.

Alandi : ध्यासचा नवीन दर्जावाढ प्राप्त विद्यालयाचा उदघाटन सोहळा आनंददायी वातावरणात

याप्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष गोरखभाऊ काळोखे, डाॅ दीपकभाई शहा, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेशभाई शहा, सदस्य गणेश खांडगे, विलास काळोखे, संदीप काकडे, निरूपा कानिटकर,संजय साने, युवराज काकडे,रणजित काकडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.