Maval : माळवाडी येथील रस्ता क्रॉंक्रीटीकरण कामास सुरुवात

एमपीसी न्यूज – माळवाडी येथील (Maval ) छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते वराळेकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे वीस लक्ष निधीतून माळवाडी येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते वराळेकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ शनिवार (दि.2) रोजी संपन्न झाला.

या भूमिपूजन समारंभास सरपंच पल्लवी दाभाडे, उपसरपंच रेश्मा दाभाडे,सदस्य दिपक दाभाडे, पूजा दाभाडे,पल्लवी मराठे, जयश्री गोटे, पूनम आल्हाट, मनीषा दाभाडे, सचिन शेळके, विदुर पचपिंड, सुधीर आल्हाट, ग्रामविकास अधिकारी जीएस खोमणे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Talegaon Dabhade : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेत शिक्षक दिनाचे आयोजन

तळेगाव दाभाडे शहरालगत असणाऱ्या माळवाडी परिसरात (Maval ) नागरिकीकरण वाढत आहे. त्यामुळे या भागातील वाढत्या रहदारीचा विचार करुन हा रस्ता करण्याची ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून मागणी होती. माळवाडी गावात कॉंक्रिटचा पक्का रस्ता होऊन कायमस्वरुपी समस्या मिटणार असल्याने ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.